३३.
वेणी घातली तिपेडी
त्यात गुलाबाचे फूल;
आज माफ असू द्यावी
कमीजास्त चूकभूल.
३४.
गळा उभार उघडा
लखलखता अंगार;
पाठीवर अष्टमीची
झळाळती चंद्रकोर.
३५.
तमा नाही अंधाराची
एक पणती लावू दे;
फार वाटते एकटे
हात हातात राहू दे.
३६.
मागे सारलेल्या झाल्या
मुक्या काचेच्या बांगड्या;
पण तोरड्यांनी केल्या
रुणझुणत चहाड्या.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा