४४.
माझे दुखता खुपता
तुझा जीव खालीवर;
देवा समोरची ज्योत
जशी हाले थरथर.
४५.
जेव्हा जेव्हा निराशेने
माझ्या मनाला घेरले;
तुझ्या हासण्याने तेव्हा
बीज आशेचे पेरले.
४६.
तिच्या हातच्या चवीने
गोड लागते भाकर;
जिच्यापुढे फिक्की देवा
तुझ्या पुढची साखर.
४७.
मला लागली ठोकर
आनंदाच्या सोहळ्यात;
घास अडला असेल
तुझ्या दाटल्या गळ्यात.
४८.
जिचा उपटला केस
तीच पापणी गळेल;
जीव एकमेकांसाठी
तसा आपला जळेल.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा