५६.
नाही थांबविता आला
मला घड्याळाचा काटा;
अनवाणी पायांपुढे
माझ्या होत्या बारावाटा.
५७.
ताडामाडासारखा तू
जाई उंच गगनात;
खुरटल्या बाभळीला
नको आणू तू मनात.
५८.
एक दिसाचा अबोला
वाटे लोटलं वरीस;
अरे मरण चांगलं
अशा जगण्यापरीस.
५९.
सार्या जगाचा संताप
तुझ्यावर मी काढला;
तरी नेमाने ताटात
घास प्रेमाचा वाढला.
६०.
काय कोणाला सांगावे?
काय कोणाला कळेल?
दृष्टी एकमेकांकडे
पुन्हा आपली वळेल.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा