शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

प्रदीर्घ आणि मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

३३.

वेणी घातली तिपेडी
त्यात गुलाबाचे फूल;
आज माफ असू द्यावी
कमीजास्त चूकभूल.

३४.

गळा उभार उघडा
लखलखता अंगार;
पाठीवर अष्टमीची
झळाळती चंद्रकोर.

३५.

तमा नाही अंधाराची
एक पणती लावू दे;
फार वाटते एकटे
हात हातात राहू दे.

३६.

मागे सारलेल्या झाल्या
मुक्या काचेच्या बांगड्या;
पण तोरड्यांनी केल्या
रुणझुणत चहाड्या.

Read more...

३७.

तुझ्या कपाळाचे कुंकू
माझ्या छातीला लागले;
तेव्हापासून अवघे
माझे आयुष्य रंगले.

३८.

एकसारखे काढले
तुझ्या तिफणीने तास;
उपणत्या ओटीतून
माझ्या जिवाला उल्हास.

३९.

गेली सरोनिया रात,
नाही बोलणे सरले;
पापण्यात थेंबभर
मागे बरेच उरले.

Read more...

४०.

तुझ्या असण्याने येते
घरालाही घरपण;
तुझ्या नसण्याने होते
चार भिंतीचे स्मशान.

४१.

भोग भोगता भोगता
भोग सरता सरेना;
राहे रिकामे शेवटी
मन कशाने भरेना.

४२.

माझे जळते मस्तक
फुटू पाहते क्षणात;
ठेव कपाळावरती
तुझा चंदनाचा हात.

Read more...

४३.

आहे नेहमीची घाई
थांब माझ्यापाशी थोडे;
तुझ्या पदराने माझे
हात करू दे कोरडे.

Read more...

४४.

माझे दुखता खुपता
तुझा जीव खालीवर;
देवा समोरची ज्योत
जशी हाले थरथर.

४५.

जेव्हा जेव्हा निराशेने
माझ्या मनाला घेरले;
तुझ्या हासण्याने तेव्हा
बीज आशेचे पेरले.

४६.

तिच्या हातच्या चवीने
गोड लागते भाकर;
जिच्यापुढे फिक्की देवा
तुझ्या पुढची साखर.

४७.

मला लागली ठोकर
आनंदाच्या सोहळ्यात;
घास अडला असेल
तुझ्या दाटल्या गळ्यात.

४८.

जिचा उपटला केस
तीच पापणी गळेल;
जीव एकमेकांसाठी
तसा आपला जळेल.

Read more...

नवीन ब्लॉग : ॥ नाथमाउली ॥

हातरूण हे महाराष्ट्रातील छोटेसे आडवळणी गाव . अकोला जिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघ्या पस्तीस कि.मि. अंतरावर. नाथा बाबा ह्या थोर संताच्या वास्तव्याने ते तीर्थ झाले.नाथ बाबांचे लौकिक नाव महादेवनाथ यादवनाथ पारसकर.उण्यापु-या ऐंशी वर्षाच्या आयुष्यात लोकमानसावर संस्कार करणारे ते चालते बोलते लोकविद्यापीठ होते.त्या महान संताच्या चरणी ही विनम्र श्रद्धांजली... येथे वाचा
Powered By Blogger
Blogvani.com

  © Blogger templates Shiny by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP