शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

प्रदीर्घ आणि मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

२३.

दोन मने झाली एक
त्याला प्रेम असे नाव;
एकतर्फी वासनेला
फ‍क्‍त शरीराची हाव.

Read more...

२४.

तुझाविन माझे सख्या
नाही पानही हालत;
अडखळते पाऊल
नाही एकटे चालत.

२५.

टाकले मी मायबाप,
भाऊ-बहीण सोडले;
तुझ्या एका जीवासाठी
माझे माहेर तोडले.

२६.

एक सोन्याचे डोरले,
चार काळे काळे मणी;
कच्च्या धाग्यात दुहेरी
दोन जिवांची गुंफणी.

Read more...

२७.

गळाभर गळसरी
तुटू नको देऊ बाई;
तोच जिवाला आधार
सुटू नको देऊ बाई.

२८.

जिच्या गालावर खळी
तीच पतीची लाडकी;
तिच्या संसारात सुखी
रिती गाडगी-मडकी.

२९.

नाही रुतू दिले काटे
झाली पायात वहाण;
बोटभर कुंकासाठी
जन्म टाकला गहाण.

Read more...

३०.

असो करोडपती गं
जिचा तिला लखलाभ;
लाभो कुंकवा आयुष्य
माझा एवढाच लोभ.

३१.

डोक्यावरून पदर,
तुझ्या ओंजळीत दिवा;
उजळल्या चेहर्‍याने
किती बरे वाटे जिवा.

३२.

नको पूजा,नको पोथी,
नको व्रत,नको तीर्थ;
नाही नांदती लक्षुमी
तेथे नारायण व्यर्थ.

Read more...

नवीन ब्लॉग : ॥ नाथमाउली ॥

हातरूण हे महाराष्ट्रातील छोटेसे आडवळणी गाव . अकोला जिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघ्या पस्तीस कि.मि. अंतरावर. नाथा बाबा ह्या थोर संताच्या वास्तव्याने ते तीर्थ झाले.नाथ बाबांचे लौकिक नाव महादेवनाथ यादवनाथ पारसकर.उण्यापु-या ऐंशी वर्षाच्या आयुष्यात लोकमानसावर संस्कार करणारे ते चालते बोलते लोकविद्यापीठ होते.त्या महान संताच्या चरणी ही विनम्र श्रद्धांजली... येथे वाचा
Powered By Blogger
Blogvani.com

  © Blogger templates Shiny by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP