शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

प्रदीर्घ आणि मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

१.

सखी,प्रेयसी,अर्धांगी
एक होऊन आलीस;
तूच राधा,तूच मीरा,
तूच रुक्मिणी झालीस.


२.

माझ्या अंगणात होते
तुझे पाऊल पडत;
वाटे अचानक आले
पान सोन्याचे उडत.




३.

नेते गुलाबी ओढणी
मन ओढत ओढत;
तिची साधीसुधी गाठ
नाही पिच्छाच सोडत.

Read more...



४.

माझ्या आशेवाणी तोही
नाही मेला सालोसाल;
जीव धरून मुठीत
होता इवला रुमाल.


५.

तुझ्या गालावर तीळ,
तुझ्या ओठांमध्ये गूळ;
गोड गोड बोलण्याचे
तुला भलतेच खूळ.


६.

तुझ्या बेसरीचा खडा
चमचम चमकला;
माझ्या अंधार्‍या मनात
त्याने उजेड पाडला.

Read more...

७.

दाराहून येता जाता
भेटीगाठीचा बहाणा;
वेडा होतोच शेवटी
इथे कुणीही शहाणा.

Read more...

८.

तुझ्या दारात मोगरा,
माझ्या घरात सुगंध;
तुझा माझ्याशी असेल
कोण्या जन्माचा संबंध.

Read more...

९.

तुझ्या हासण्याने होते
माझी साजरी दिवाळी;
तुझ्या रुसण्याने चेते
माझ्या उरामधे होळी.

Read more...

१०.

साध्या साध्या बोलातून
तूच साखर पेरली;
माझी चळती नजर
तूच अचूक हेरली.

Read more...

११.

भले बुरे दाखवण्या
तूच आरसा झालीस;
डोळ्यांपुढे असूनही
नाही लक्षात आलीस.

Read more...

१२.

कोर्‍या कागदावर तू
नाव लिहिले कोणाचे;
याच कल्पनेने झाले
लाख तुकडे मनाचे.

Read more...

१३.

मन मोकळे करण्या
होते तुला भेटणार;
रीतिरिवाजांचे पण
गेले आडवे मांजर.

Read more...

१४.

नको सोसू तू मुक्याने
घाव होऊ दे बोलका;
होतो बोलता बोलता
भार दु:खाचा हलका.

Read more...

१५.

तुझ्या मनातला सल
टाक सांगून एकदा;
आज ठेवू नको गडे
तुझ्या-माझ्यात पडदा
.

Read more...

१६.

वाट पाहिली पत्राची
डोळे लावून वाटेला;
युग लोटले वाटते
तुझ्या मागच्या भेटीला.

Read more...

१७.

तुझ्या मनाचा कागद
माझ्या आसवांची शाई;
पत्र लिहिले असे की
कोणी वाचणार नाही.

१८.

चार बोटांचा चिटोरा
दोन मनाला जोडतो;
साताजन्माचा आनंद
एका क्षणात मिळतो.

१९.

तुझ्या हाती सुईदोरा,
माझे पाऊल अडले;
माझ्या शर्टाने बटन
तेव्हा जाणून तोडले.

Read more...

२०.

गेला डोळ्यात कचरा
तूच घातली फुंकर;
साधीसुधी तू पार्वती
तुझा भोळा मी शंकर.

२१.

कधी टपोर आवळे,
कधी चिंचा, कधी बोरं;
आंबटशा आठवणी
गोड लागतात बरं.

२२.

माझ्या हृदयात तुझे
असे जाणवे स्पंदन;
जसे गाभार्‍यात कोण्या
तेवणारे निरांजन.

Read more...

नवीन ब्लॉग : ॥ नाथमाउली ॥

हातरूण हे महाराष्ट्रातील छोटेसे आडवळणी गाव . अकोला जिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघ्या पस्तीस कि.मि. अंतरावर. नाथा बाबा ह्या थोर संताच्या वास्तव्याने ते तीर्थ झाले.नाथ बाबांचे लौकिक नाव महादेवनाथ यादवनाथ पारसकर.उण्यापु-या ऐंशी वर्षाच्या आयुष्यात लोकमानसावर संस्कार करणारे ते चालते बोलते लोकविद्यापीठ होते.त्या महान संताच्या चरणी ही विनम्र श्रद्धांजली... येथे वाचा
Powered By Blogger
Blogvani.com

  © Blogger templates Shiny by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP